Sunday, January 15, 2017

पुस्तकभेट - मुळशी

बीजाचे अंकुरात अन अंकुराचे रोपात रूपांतर होताना खूप च काळजी घ्यावी लागते. त्याला योग्य प्रमाणात पोषक मूलद्रव्ये मिळाली कि ते बहरायला लागते. एकदा का दे बहरायला लागले कि ते आणखी बहरतच जाते. त्या निरागस चिमुरड्यांना अशाच मूलद्रव्यांची, संस्कारांची गरज असते. योग्य त्या वेळेला योग्य त्या गोष्टी मिळत गेल्या की सगळं कसं सुरळीत चालू लागतं. स्वतःचा रस्ता स्वतः तयार करणाऱ्या, किंबहुना कधी कधी भटकणाऱ्या वेळी सुद्धा असतातच कि. पण महत्वाचे म्हणजे धडपड करून स्वतःसाठी वाट निर्माण करणं.
मोत्यांची माळ निसर्गात कुठेच तयार होत नसते, एक एक मोती शोधून, गुंफून माळ तयार करायची असते अन त्या अगोदरची मोती तयार होण्याची प्रक्रिया तर निराळीच !
वाचनामध्ये प्रचंड ताकद आहे हे सांगायची खरं तर गरजच नाही, तरी सुद्धा कधी शंका आलीच तर कोणतेही थोर व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आणा, मग आपोआपच सारं काही उमगत जाईल. डॉ. बाबासाहेबाब आंबेडकर, ए पी जे अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन. एवढंच काय तर अगदीच अलीकडच्या काळात गाजलेले सैराट असे दिग्दर्शक नागराज मंजुळे. या सर्व व्यक्ती वाचनामुळेच यशस्वी आहेत.
आणि आज आमचा यासाठीच झालेला काहीसा प्रयत्न जेणेकडून बालपणापासूनच काही चांगल्या गोष्टी घडवून आणण्यासाठी !
काळाची गरज (न) असलेला मोबाइल अथवा तत्सम काही घेऊनसुद्धा जेवढा आनंद होत नसेल कदाचित असा आनंद अन मिळालेले पुस्तक चटकन उघडून वाचण्याची आतुरता त्यांचे हसरे चेहरेच सांगत होते. पुस्तकांमधील बोलकी चित्रे अन थोर व्यक्ती पहाताना त्यांचे चेहरे बोलके झालेले दिसत होते, प्रगत झालेल्या भावना दिसत होत्या अन आमचा त्यांना हे असे पाहतानाच आनंद तर शब्दात व्यक्त करणे थोडे अवघडंच !
मनाला समाधान होते कि देशाचे उज्वल भवितव्य घडवण्यात आमचाही असा हा खारीचा वाटा !

शिक्षक दिनानिमित्त आम्ही पुस्तक वाटपाचा कार्यक्रम मुळशी भागातील १० शाळांमध्ये केला.